राज्यात पावसाची स्थिती आणि हवामान प्रणाली
महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. विशेषतः सांगली, कोल्हापूरचा पूर्व
Solar Zatka Machine Kit भाग, नाशिक, मराठवाडा, अमरावती आणि अकोला परिसरात पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. सध्या केरळ, कर्नाटकपासून ते विदर्भ आणि पूर्वोत्तर भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारे कोरडे वारे यांच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात मेघगर्जनेसह
Flame Proof Torches पाऊस देणारे ढग तयार होत आहेत. महाराष्ट्राच्या आसपास असलेल्या वेस्टर्ली ट्रफमुळे ढगांची उंची वाढत असून, यामुळेच गारपिटीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळची स्थिती आणि ढगांची वाटचाल
२० एप्रिलच्या सकाळी छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत पावसाच्या
Brush Cutters ढगांची उपस्थिती जाणवली. तसेच पुण्याचा पश्चिम भाग, रायगड आणि सोलापूर-धाराशिवच्या दक्षिण सीमेवर हलके पावसाचे ढग पाहायला मिळाले. हे ढग सध्या उत्तर-पूर्व दिशेला सरकत असून दुपारपर्यंत विरून जातील.
Water Soluble Fertilizers मात्र, दुपारनंतर राज्यात पुन्हा नव्याने ढगनिर्मिती होण्याची शक्यता असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढू शकतो.
















