शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची सूचना: केवायसी प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ration card big update

ration card big update महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार, शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आली आहे. शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींच्या आधारकार्डसह केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शिधापत्रिकेतील मयत सदस्यांची नावे वगळा

शासनाच्या आदेशानुसार, शिधापत्रिकेमध्ये नोंद असलेले मयत सदस्य ज्यांचे नावे अद्याप वगळण्यात आलेले नाहीत, त्यांची नावे तात्काळ काढण्यासाठी शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी मयत व्यक्तीचा मृत्युदाखला, आधारकार्ड आणि शिधापत्रिका आवश्यक कागदपत्रे म्हणून सादर करावी लागतील.

केवायसी प्रक्रिया बंधनकारक

सर्व शिधापत्रिका धारकांना आपल्या शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींच्या आधारकार्डसह शेजारील रेशन दुकानात जाऊन केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करण्यासाठी अंगठ्याचा ठसा घेणे आवश्यक आहे. ज्या सदस्यांचे सत्यापन पूर्ण होणार नाही, त्यांचे नाव शिधापत्रिकेतून वगळले जाईल आणि त्यांच्या शिधा जिन्नसाची मिळकत बंद होईल.

हे पण वाचा:
कापूस बाजार भाव देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 18 ऑक्टोबर 2024

अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024

केवायसी प्रक्रिया करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. यानंतर केवायसी न केल्यास शिधापत्रिकेतील नावे वगळली जातील आणि रेशन धान्य मिळणे बंद होईल. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

रेशन धान्य बंद होण्याची शक्यता

जर शिधापत्रिकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही तर रेशन धान्य बंद होण्याची शक्यता आहे. शिधापत्रिका धारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड घेऊन शेजारील रेशन दुकानात जाऊन व्हेरिफिकेशन करून घेणे अत्यावश्यक आहे.

हे पण वाचा:
कापूस बाजार भाव गुजरात आजचे कापूस बाजार भाव Gujarat Cotton rate 18 ऑक्टोबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा