परतीचा पाऊस आज 23 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनने राजस्थानच्या पश्चिम आणि कच्छ भागातून माघारी फिरण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कळवले आहे की परतीचा पाऊस राज्यात सुरू झाला आहे.
Our monsoon withdrawal forecast continues to align closely with observations. Consistent with our predictions, withdrawal has begun in parts of western Rajasthan.
Image IMD observed withdrawal dates. https://t.co/OF8b10OrjV pic.twitter.com/cXgb1s9lTG
— All India Weather (AIW) (@pkusrain) September 23, 2024
राज्यात मागील 24 तासांतील पावसाची स्थिती
गेल्या 24 तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, विदर्भात हलका ते मध्यम गडगडाटी पाऊस झाला आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस झाल्याचे दिसून आले. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. कोकणात सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी आणि रायगड भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस झाल्याचे नोंदवले आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार
सध्याच्या स्थितीनुसार बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्यांचे प्रभाव दिसून येत आहेत. कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसून येईल.
राज्यात विविध भागांत आज रात्री पावसाची शक्यता: हवामान अंदाज
आज 23 सप्टेंबर रोजी रात्री राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. सध्या ढगांची स्थिती पाहता, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पावसाचा जिल्हावार अंदाज
धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, वाशिम, आणि अकोल्याच्या काही भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली आणि कोकणातील किनारपट्टीवरील भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत.
काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता
नवापूर, साखरी, सिंदखेडा, सटाणा, चोपडा, यावल, धरणगाव, अमळनेर या भागांत आज रात्री पावसाची शक्यता आहे. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, नेवासा, शिरेगोंदा, दौंड, पुणे, सासवड आणि खेड या भागांमध्येही पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज
खंडाळा, कोरेगाव, कराड, बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूरच्या काही भागांत पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या किनारपट्टीच्या भागांतही आज रात्री पावसाची शक्यता राहील.
विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक पावसाचे संकेत
बीड, गेवराई, माजलगाव, शिरूर कासार, जालना, परभणी, जिंतूर, लातूर, नांदेड आणि वाशिमच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या भागांमध्ये तुरळक स्वरूपात पावसाचे संकेत आहेत.
सार्वत्रिक पाऊस न होण्याची शक्यता
राज्यातील बहुतांश भागांत पाऊस होण्याची शक्यता असली तरी, काही ठिकाणीच पावसाचे प्रमाण अधिक राहील.
राज्यात उद्या पावसाचा जोर वाढणार: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागांतही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे, सातारा, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या पट्ट्यात विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासोबत मेगर्जनेसह होईल
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे संकेत
नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि जळगाव या विदर्भातील जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतही विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी बरसतील.
पावसाची अनियमितता आणि वळीव स्वरूप
राज्यातील पाऊस मुख्यतः मेघगर्जनेसह वळीव स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. एकाच वेळी सार्वत्रिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. पाऊस पडणाऱ्या भागात जोरदार सरी तर काही ठिकाणी कोरडेपणाही राहू शकतो.
उद्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा: हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने उद्या, 25 सप्टेंबरसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पावसासोबत मेघगर्जनेही होण्याची शक्यता आहे.
सातारा आणि कोल्हापूरसाठी मुसळधार पावसाचा इशारा
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी घाट भागांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा आहे. हवामान विभागाने सांगितले आहे की, हा पाऊस कोणत्याही भागात होऊ शकतो.
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट
पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मेघगर्जनेसह अन्य जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
अन्य भागात पावसाचा येलो अलर्ट
पालघर, नंदुरबार, धुळे, सांगली, सोलापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
25 सप्टेंबरसाठी हवामान विभागाचा अलर्ट: रायगड, पुणे आणि अन्य जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने 25 सप्टेंबर रोजी रायगड आणि पुणे जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुण्यात एक दिवसासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट
सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
इतर भागांतही पावसाचा येलो अलर्ट
सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच, सांगली आणि कोल्हापूर भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.