उजनी धरण सद्यस्थिती आणि पाणी पातळी!

आज शनिवार, 21 सप्टेंबर सकाळी 6:30 वाजता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, उजनी धरणातील पाण्याची पातळी  विषयी अधिक माहिती पाहूयात. सोलापूर जिल्हा व परिसरात जरी काल अत्यल्प पाऊस झाला असला तरी पंढरपूर शहर आणि परिसरात पहाटेपासूनच ढग दाटून आले होते, आणि सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे.

परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम

हवामान विभागाने यापूर्वीच अंदाज वर्तवला होता की, पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहील. हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पडेल आणि त्यामुळे उजनी धरण व परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी

आजपर्यंत उजनी धरण परिसरात 396 मिमी पावसाची नोंद झाली आहे, आणि धरणातील एकूण पाण्याची पातळी 120.47 टीएमसी एवढी नोंदवण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
हवामान अंदाज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राज्यात कसा राहील पाऊस – हवामान अंदाज

उजनी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती: पातळी 106.04% वर, विसर्गाची नोंद

उजनी धरणातील पाण्याची पातळी सध्या 106.04% झाली आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, धरणात 56.81 टीएमसी पाणी उपयुक्त साठा म्हणून उपलब्ध आहे. दौंड येथून धरणात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट झाल्याने सध्या उजनी धरणामध्ये 2891 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग

उजनी धरणातून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये 175 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मुख्य कॅनलमधून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, 1600 क्युसेक याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. बोगद्याद्वारे 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हे पण वाचा:
रेशन कार्ड 5.8 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द: डिजिटायझेशनमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत क्रांती

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा