× whatsapp--v1शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा

Spray pump Yojana बॅटरी फवारणी पंप वितरण योजना: लॉटरीद्वारे पात्र शेतकऱ्यांना लाभ

Spray pump Yojana

Spray pump Yojana पात्र शेतकऱ्यांना लॉटरीद्वारे फवारा पंप मिळणार

राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी विभागाच्या अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजना लॉटरी जाहीर केली असून, पात्र शेतकऱ्यांना SMS द्वारे त्यांची निवड झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ही योजना राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादकता विकास आणि मूल्य साखळी योजनेंतर्गत राबवली जात आहे.

वितरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार Spray pump Yojana

लॉटरीद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून लवकरच बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपांचे वितरण केले जाणार आहे. यासंबंधी कृषी विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे, जसे की आधार कार्ड, डिजिटल सातबारा, बँकेचे पासबुक इत्यादी तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कागदपत्रांचे ऑनलाइन अपलोड किंवा प्रत्यक्ष कृषी कार्यालयात भेटीसाठी सूचनाही दिल्या जातील.

योजना अंमलबजावणीमध्ये विलंब Spray pump Yojana

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरुवातीला टेंडर प्रक्रियेमध्ये काही व्यत्यय आल्यामुळे योजना अनेक वेळा मुदतवाढ देऊन पुढे ढकलण्यात आली होती. अखेर 9 सप्टेंबर 2024 रोजी लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पात्र लाभार्थ्यांना फवारणी पंपांचे वितरण तातडीने सुरू होईल.

कृषी विभागाच्या सूचनांनुसार पुढील पावले उचला Spray pump Yojana

लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पुढील सूचनांची वाट पाहावी आणि वेळेत सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. कृषी कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया आणि इतर तपशील लवकरच उपलब्ध होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top