pm Kisan new registration पीएम किसान योजनेसाठी नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल

pm Kisan new registration कागदपत्रे अनिवार्य

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जमा documents करावी लागणार आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभागाने जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकात या बदलांची माहिती देण्यात आली आहे. नवीन नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

नोंदणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल

पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना चार मुख्य कागदपत्रे अनिवार्यपणे अपलोड करावी लागणार आहेत. ही कागदपत्रे 200 केबी फाईल मर्यादेत असावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

आवश्यक कागदपत्रे important documents

  1. डिजिटल सातबारा उतारा – मागील तीन महिन्यांतील डिजिटल किंवा तलाठी सही असलेला सातबारा उतारा. हा उतारा फॉर्म भरताना अपलोड करावा लागेल.
  2. जमीन नोंदणीचा फेरफार – लाभार्थ्याच्या नावे 1/2/2019 पूर्वीची जमीन धारणा असणे आवश्यक आहे. जर जमीन वारसा हक्काने हस्तांतरित झाली असेल, तर त्याचाही फेरफार द्यावा लागेल.
  3. वारस नोंद फेरफार – जर वारसा हक्काने जमीन मिळाली असेल आणि 1/2/2019 नंतर नावावर आली असेल, तर त्यासंबंधित फेरफार जोडणे गरजेचे आहे.
  4. पती, पत्नी व 18 वर्षांखालील अपत्यांचे आधार कार्ड – पती, पत्नी आणि 18 वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड एकाच पानावर स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. यामध्ये कोणतेही बदल असल्यास शेतकऱ्यांनी वेळेत योग्य ती कागदपत्रे जमा करून योजनेचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा:
Ladki Bahini Yojana Maharashtra लाडकी बहीण योजनेतून दिवाळी बोनस मिळणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती Ladki Bahini Yojana Maharashtra

पीएम किसान योजनेसाठी लाभार्थ्यांच्या अपात्रता मागे घेण्याची प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांची यादी

पडताळणीसाठी कागदपत्रे अनिवार्य

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मंजूर होईल. सर्व कागदपत्रे योग्य असल्यासच मान्यता मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

अर्ज रिजेक्ट झाल्यास लाभार्थ्यांना संधी former rejection

जर कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर त्यांना अपात्रता मागे घेण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत संबंधित शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:

  1. अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज – शेतकऱ्यांनी अपात्रता मागे घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरावा लागेल.
  2. पोर्टलवर दर्शवलेले स्टेटस प्रिंट – लाभार्थीचे अर्जाचे पोर्टलवर दिसणारे स्टेटस प्रिंट करून सादर करावे लागेल.
  3. आधार कार्ड – लाभार्थीचे आधार कार्ड, तसेच पती-पत्नी व 18 वर्षांखालील अपत्यांच्या आधार कार्डांचे प्रमाणपत्र जमा करावे लागेल.
  4. परिशिष्ट बी प्रमाणपत्र – कृषी सहाय्यकांनी प्रमाणित केलेले परिशिष्ट बी सादर करणे आवश्यक आहे.
  5. सातबारा उतारा – नवीन सातबारा व आठव उतारा, डिजिटल स्वरूपात किंवा तलाठी सहीसह, सादर करावा लागेल.
  6. जमीन नोंदणी फेरफार – जमीन नोंदणीचा फेरफार, तसेच वारसा नोंदणीसाठी आवश्यक फेरफार जोडावा लागेल.

अर्ज पुनः सादर करण्याची प्रक्रिया

वरील सर्व कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावीत. शेतकऱ्यांच्या अर्जाचे योग्य पडताळणीनंतर अपात्रता मागे घेण्याची कार्यवाही होईल आणि पुन्हा योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळेल.

हे पण वाचा:
ration card big update शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची सूचना: केवायसी प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ration card big update

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे शासनाने सुचवले आहे.

हे पण वाचा:
कापूस बाजार भाव देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 18 ऑक्टोबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा