nuksan bharpai राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडून निर्देश देण्यात आले असून, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंचनामे प्रक्रियेत शेतकऱ्यांना दिलासा nuksan bharpai
विविध जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा, तालुका, आणि ग्राम स्तरावर समित्या नेमून या पंचनामे प्रक्रिया जलदगतीने पार पाडली जात आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाढीव भरपाई nuksan bharpai
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफ निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना 8,500 रुपयांच्या ऐवजी 13,600 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येईल.
नुकसान भरपाई पंचनाम्याच्या प्रक्रियेतून शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव
nuksan bharpai तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या समितीच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण पार पाडले जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डाटा तहसील कार्यालयाकडे जमा केला जाईल, आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला जाईल. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाईल.
नुकसान भरपाई राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा
या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. पंचनामे प्रक्रिया जलद पार पाडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.