Ladki Bahini Yojana Maharashtra लाडकी बहिण योजनेचा एप्रिल हप्ता; 30 एप्रिलला महिलांच्या खात्यात जमा होणार
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. महिन्याच्या अखेरीस येणारा हा हप्ता महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार असला, तरी यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांत लाभार्थ्यांची संख्या बदलली
गेल्या काही महिन्यांत लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात, शासनाने 65 वर्षांवरील महिलांना अपात्र ठरवले होते. तसेच ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, अशा महिलांनाही योजनेपासून वगळण्यात आले. यामुळे त्या महिन्यात लाभार्थ्यांची संख्या काहीशी घटली होती.
मार्च महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली
मात्र, मार्च महिन्यात लाभार्थ्यांची आकडेवारी पुन्हा वाढताना दिसली. यामागचं कारण म्हणजे त्या महिन्यात छाननीची प्रक्रिया तुलनेत कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे अनेक महिलांना पुन्हा लाभ मिळाल्याचं निदर्शनास आलं.
एप्रिल महिन्याचा हप्ता आणि साशंकता
आता एप्रिल महिन्यासाठी, ही संख्या वाढणार की घटणार यासंदर्भात साशंकता आहे. कारण सध्या छाननी प्रक्रिया ठप्प झाल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारने आयकर विभागाकडे सुमारे 2 कोटी 45 लाख महिलांची उत्पन्नविषयक माहिती मागवली होती, परंतु चार महिने उलटूनही यावर ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या तपशीलांवरच यावेळचा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मार्च महिन्याची आकडेवारी आधार मानून हप्ता
त्यामुळे मार्च महिन्याची लाभार्थी आकडेवारी जसच्या तशी राहील आणि तीच माहिती आधार मानून एप्रिलचा हप्ता जारी केला जाईल, असे संकेत आहेत.