hawamaan andaaz आज २२ ऑक्टोबर सकाळी ९:३० वाजेपर्यंत राज्यातील हवामानाचा आढावा घेतल्यास, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले आहे. या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या सिस्टीममुळे राज्यातील काही भागांत अजूनही बाष्प पोहोचत असून, काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
राज्यातील पावसाचे अंदाज
राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. याठिकाणी पुढील २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई आणि कोकणातील परिस्थिती
मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाल्यास गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. अन्यथा या भागांत हवामान कोरडे राहील.
विदर्भातील हवामान
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची सध्या विशेष शक्यता नाही, आणि हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील काही भागांत पुढील २४ तासांत पाऊस होण्याची शक्यता आहे, तर इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील.