hawamaan andaaz राज्यातील हवामानाचा आढावा घेतल्यास, काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ या कालावधीत राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर, धाराशिव, नगर, सातारा, पुणे, कोल्हापूर, लातूर आणि धाराशिवच्या काही भागांत पाऊस झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, मुंबईपासून गोव्यापर्यंत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची नोंद
नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेडच्या काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. तसेच, राज्यातील काही भागांमध्ये हवामान कोरडे असल्याचे दिसून आले आहे.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. आज रात्रीपर्यंत हे क्षेत्र तीव्र कमी दाबाच्या स्थितीत बदलण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
राज्यात पावसाचा हळूहळू घट
राज्यात अजूनही काही भागांमध्ये पावसाचे वारे येत असले तरी उत्तरेकडून कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर उत्तरेकडून दक्षिणेकडे हळूहळू कमी होत जाणार आहे.
तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर कमेंट करून कळवा!
राज्यात काही भागांत पावसाचा जोर कायम, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या हालचालींची वाटचाल सुरू
राज्यात काही भागांत पावसाचे ढग सक्रिय असून, पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होईल. राज्यातील नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांत पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत.
चक्रीवादळाची वाटचाल: २४ तारखेला तीव्र चक्रीवादळाची शक्यता
बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल आणि २४ ऑक्टोबरपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ ओडिशा किंवा पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, मात्र काही मॉडेल्स दक्षिण भारत किंवा बांगलादेशच्या दिशेनेही जायचा अंदाज व्यक्त करतात.
The Low Pressure Area over the Eastcentral Bay of Bengal and adjoining north Andaman Sea movedwest-nortwestwards and lay as Well marked low pressure area over eastcentral Bay of Bengal at 1130 hours IST oftoday, the 21st October 2024. It is very likely to move… pic.twitter.com/wvVA2wAuv3
— India Meteorological Department (@Indiametdept) October 21, 2024
राज्यात पावसाची स्थिती
सकाळपासूनच बीड, परभणी, जालना आणि आसपासच्या भागांमध्ये गडगडाटासह पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. राज्यातील इतर भागांमध्येही ढगाळ वातावरण कायम असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुम्हीही तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर कमेंट करून कळवा.
चक्रीवादळाच्या हालचालींबाबत पुढील अपडेट्स येताच आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती त्वरित दिल्या जातील.
राज्यातील हवामानाचा अंदाज: अनेक जिल्ह्यांत आज रात्री पावसाची शक्यता
राज्यातील हवामान परिस्थितीचा आढावा घेतल्यास, आज रात्री अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि राज्यातील ढगांची वाटचाल पाहता, काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल.
पावसाची शक्यता असलेले प्रमुख भाग
राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, आणि बीड या भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, भोर, मुळशी, मावळ, आंबेगाव, आणि शिरूर भागांत पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, तुळजापूर, धानोरा आणि उमरगा या भागांत आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे संकेत
नाशिक जिल्ह्यात सिन्नर, निफाड, चांदवड, देवळा, मालेगाव, येवला, नांदगाव या भागांत पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातही काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर (वैजापूर, कन्नड, खुलताबाद), बीड, आणि धाराशिव भागांत पाऊस होईल.
विदर्भातील पावसाची शक्यता
विदर्भातील गडचिरोली, सिरोंचा, आणि आसपासच्या भागांतही पावसाचे ढग सक्रीय आहेत. या भागांत आज रात्री पावसाची शक्यता आहे.
राज्यात उद्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागांत कोरडे हवामान
राज्यातील हवामान अंदाजानुसार, उद्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि रत्नागिरी या भागांमध्येही पावसाची शक्यता अधिक राहील.
विदर्भातील पावसाची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर पावसाची शक्यता आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यापर्यंतही काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा: कोरडे हवामान
उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांत विशेष पावसाचा अंदाज नाही. हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
उद्या राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज असून, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा इशारा: नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांत यलो अलर्ट
हवामान विभागाने उद्या नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर, मुंबई आणि अन्य जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
पालघर, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत किरकोळ पावसाची शक्यता
अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत किरकोळ हलक्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यातील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.