hawamaan Andaaz आज २१ ऑक्टोबर सकाळी ९:३० वाजता मिळालेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागांत हवामान कोरडे राहील.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढून आज तीव्र कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल. उद्यापर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून, ढगांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत राहील.
21 Oct, Latest satellite obs over Arbian sea & Bsy of Bengal this morning.
Goa & N Karnataka looks partly cloudy & cloud mass ovr east central BoB, likly to intensify in depression in 24hrs &🌀 cyclone by 23 Oct as per lMD forecast. It’s likely to move NorthWest wards. Watch pl. pic.twitter.com/W1PTJAR8UA— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 21, 2024
पुणे, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
पुढील २४ तासांत पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगरचे दक्षिणेकडील भाग आणि धाराशिव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस
ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. इतर भागांत मात्र स्थानिक वातावरण तयार झाल्यास थोडासा पाऊस होऊ शकतो.
इतर भागांत हवामान कोरडे
मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, आणि नांदेडच्या काही भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज नाही.
राज्यात सर्वत्र सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता कमी आहे, परंतु काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल.