Current Status of Ujani Dam उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढली

Current Status of Ujani Dam सोलापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. कालच्या दिवसभरात उजनी धरण आणि त्याच्या आसपासच्या परिसरात 42 मिमी पावसाची नोंद झाली असून, 1 जूनपासून आतापर्यंत 470 मिमी पाऊस झालेला आहे.

पाण्याच्या विसर्गात वाढ

दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात दुपटीने वाढ झालेली असून, सध्या 4350 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. उजनी धरणामध्ये एकूण 121.32 टीएमसी पाणीसाठा आहे, त्यापैकी 57.66 टीएमसी पाणी उपयुक्त पाणीसाठा आहे.

उजनी धरणाची पाण्याची पातळी 107.62%

उजनी धरणाची पाण्याची पातळी सध्या 107.62% एवढी झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि परिसरात पावसामुळे जलसाठ्यात झालेली वाढ वाढ झाली आहे.

हे पण वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला: वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी पाण्याचा वापर

काल संध्याकाळी 8:30 वाजल्यापासून उजनी धरणातून 1600 क्युसेक पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. यासोबतच, उजनी धरणातून सीनामाडा डाव्या कालव्यात 175 क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक, बोगद्यामधून 40 क्युसेक, आणि मुख्य कालव्यातून 1800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

परतीच्या पावसामुळे पिकांना धोका

पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर परतीचा पाऊस सुरू असून, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागांमध्ये सोयाबीन पिकांच्या काढणीला धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने हा पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
हवामान अंदाज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राज्यात कसा राहील पाऊस – हवामान अंदाज

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा