e pik pahani last date शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना: पीक पाहणी करण्यासाठी शेवटची संधी

e pik pahani last date राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे की, पीक विमा मिळवण्यासाठी पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. पीक पाहणी करण्यासाठी आता अवघे काही तासच उरले असून, उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित ‘ई पीक पाहणी’ ॲपच्या माध्यमातून आपली पीक पाहणी पूर्ण करावी, जेणेकरून सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवता येईल.

पीक पाहणीची अंतिम तारीख 23 सप्टेंबर e pik pahani last date

1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे बंधनकारक होते. परंतु, शासनाने 8 दिवसांची मुदतवाढ देऊन 23 सप्टेंबर ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. कृषी विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी 23 सप्टेंबरपूर्वी आपली पीक पाहणी पूर्ण करावी.

पिक विमा व शेती योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी आवश्यक

यंदाच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईसाठी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे. पीक कर्ज, पीक विमा, आणि नुकसानभरपाई यांसारख्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे जर पीक पाहणी वेळेत केली नाही तर.

हे पण वाचा:
ration card big update शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची सूचना: केवायसी प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ration card big update

ई पीक पाहणीचे महत्त्व

राज्य शासनाने गेल्यावर्षीपासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा विमा योजनेकडे कल वाढला आहे. मात्र, केवळ विमा भरून काम पूर्ण होत नाही, तर पीक पाहणी करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतः आपल्या पिकाची नोंद सातबारावर करू शकतात, यासाठी तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही.

शेतकऱ्यांसाठी शेवटचा इशारा

सध्या काही मोजके शेतकरीच पीक पाहणीपासून वंचित आहेत. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी पुढील 24 तासांत आपली पीक पाहणी करून घ्यावी, जेणेकरून शासकीय शेती योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

हे पण वाचा:
कापूस बाजार भाव देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 18 ऑक्टोबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा