imd monsoon 2025 prediction लाणिनो आणि आयओडी तटस्थ; मान्सूनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही
हवामान विभागाने 15 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदा भारतात मान्सून चांगल्या स्वरूपात दाखल होण्याची शक्यता आहे. लाणिनो किंवा अल-निनो यापैकी कोणताही प्रभाव यंदा मान्सूनवर दिसणार नाही, तसेच आयओडीही तटस्थ म्हणजेच न्यूट्रल राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे दोन्ही घटक मान्सूनवर परिणाम घडवतात, परंतु यंदा ते तटस्थ असल्यामुळे पावसावर विशेष परिणाम होणार नाही.
उत्तर भारतात कमी बर्फवृष्टी – चांगल्या पावसाचा संकेत
युरोप आणि आशियातील उत्तर भाग, विशेषतः भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय भागात फेब्रुवारी व मार्च महिन्यांत नेहमीपेक्षा कमी बर्फवृष्टी झाली आहे. बर्फाची जाडीही कमी असल्याचं निरीक्षण हवामान विभागाने नोंदवलं आहे. इतिहास पाहता, ज्या वर्षी अशा प्रकारे कमी बर्फवृष्टी होते त्या वर्षी मान्सून तुलनेने अधिक चांगला बरसतो. त्यामुळे यंदाही भरपूर पावसाची शक्यता अधिक आहे.
105% पावसाचा अंदाज; सामान्यापेक्षा अधिक पाऊस imd monsoon 2025 prediction
हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनसाठी एकूण 105% पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 96 ते 104% दरम्यानचा पाऊस सामान्य मानला जातो, तर 105 ते 110% दरम्यानचा पाऊस अधिक मानला जातो. त्यामुळे यंदा सामान्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. विभागीय टक्केवारीनुसार 30% भागात सामान्य पाऊस, 33% भागात जास्त पाऊस, 26% भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवू शकते, तर फक्त 9% भागात पावसाची कमतरता आणि केवळ 2% भागात दुष्काळासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता
#SWMonsoon forecast by IMD for all India:
✔️Most parts of the country it could be #ABOVE_NORMAL,except parts of NE Region,Tamilnadu,Ladakh.
✔️105 % of the country’s LPA.
✔️ENSO neutral in Pacific Oceans
✔️Indian Ocean Dipole neutral
✔️Parts of Maharashtra & arond looks favorable pic.twitter.com/g9NmakwX71— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 15, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा नेहमीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (आकृती क्र.1) गडद निळा रंग असलेले भाग – जसे की पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नागपूर, अमरावती – या जिल्ह्यांमध्ये 75% पेक्षा अधिक शक्यता आहे की पाऊस नेहमीपेक्षा अधिक पडेल.
imd monsoon 2025 prediction राज्याच्या उर्वरित भागातही पावसाचा जोर राहणार
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशिम, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया – या जिल्ह्यांतही साधारणतः 35 ते 55% टक्क्यांनी नेहमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महिनावार अंदाज पुढील अपडेटमध्ये
सध्या हा अंदाज जून ते सप्टेंबर या पूर्ण मान्सून कालावधीसाठी एकत्रित दिला गेलेला आहे. मात्र हवामान विभाग प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीस, किंवा मागच्या महिन्याच्या अखेरीस महिनावार अंदाज जाहीर करत असतो. त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांतील पर्जन्य वितरणाबाबत पुढील अपडेटसाठी प्रतीक्षा ठेवावी लागेल.