राज्यातील थंडीचा कडाका वाढतोय तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

सोलापूरमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

आज 27 नोव्हेंबर रोजी सकाळपासून राज्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळाले. सर्वात कमी तापमान सोलापूर जिल्ह्यातील  जेऊर येथे 9°से नोंदवले गेले. पुण्यात शिवाजीनगर येथे 9.9°से, अहिल्यानगर येथे 9.4°से तापमान नोंदले गेले. नाशिकमध्ये तापमान 10 ते 11°से दरम्यान होते. परभणी, नागपूर, गोंदिया आणि उदगीर भागांतही तापमान 11°से पर्यंत खाली आले. राज्याच्या इतर भागांमध्ये 12 ते 13°से तापमान तर किनारपट्टीच्या भागांमध्ये 16 ते 18°से तापमान नोंदले गेले.

सरासरीच्या तुलनेत तापमानात घट

राज्यातील काही ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घटले आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, आणि जेऊर या भागांत सरासरीपेक्षा तापमान कमी नोंदवले गेले. राज्याच्या इतर भागांतही तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले.

चक्रीवादळ फेंजलचे अपडेट

दक्षिण भारतात पावसाची शक्यता निर्माण करणारे “फेंजल” नावाचे चक्रीवादळ श्रीलंकेजवळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ सौदी अरेबियाने नाव दिलेले असून, आज रात्रीत याच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. चेन्नई आणि तमिळनाडूच्या भागात मुसळधार पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रासाठी या चक्रीवादळाचा कोणताही तात्काळ धोका नाही. मात्र, सिस्टीम जर अरबी समुद्रात पोहोचली तर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.

हे पण वाचा:
ईव्हीएम सुप्रीम कोर्टाचा ईव्हीएम विरोधातील याचिकेला नकार

थंडीच्या लाटेचा इशारा

उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, आणि घाट विभाग वगळून राज्याच्या काही भागांत थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाने “यलो अलर्ट” दिला आहे. यामुळे या ठिकाणी तापमान 10°से पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवसांतील हवामान

राज्यातील पुणे, नाशिक, बीड, जळगाव, नांदेड, आणि परभणी या भागांत तापमान 9 ते 11°से दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नागपूर आणि गोंदिया या भागांमध्येही तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील तापमान 18 ते 20°से, तर किनारपट्टीपासून दूरच्या भागांत 14 ते 16°से दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागांत तापमान 12 ते 14°से दरम्यान राहील.

पावसाबाबत अद्याप अनिश्चितता

सध्या तरी राज्यात पावसाची शक्यता नाही. पुढील काही दिवसांमध्ये पावसासंबंधित अधिक स्पष्टता येईल. तेव्हा पुढील अपडेट्स लवकरच देण्यात येतील.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 26 नोव्हेंबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा