खरंच सात ते सहा हजार रुपये सोयाबीन बाजार भाव मिळणार का? 19 नोव्हेंबर आजच्या ताज्या बातम्या

आज 19 नोव्हेंबर 2024, मंगळवार. सोयाबीन बाजार भाव, निवडणूक, शासकीय योजना आणि हवामान अंदाज यांसंदर्भातील महत्त्वाच्या ताज्या बातम्या.

शेतकऱ्यांसाठी नवीन डिजिटल सुविधा: पीक विमा भरताय मोबाईलवर

शेतकऱ्यांना आता एक नवी डिजिटल सुविधा मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. याआधी पिक पेऱ्याची नोंदणी करण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागायचे. परंतु आता शासनाने ई पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून पीक पेऱ्याची नोंदणी मोबाईलवर सहज करता येईल.
तसेच, प्रधानमंत्री फसल बीमा योजना अॅपच्या माध्यमातून काही मिनिटांत पीक विमा भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. प्ले स्टोअरवर अधिकृत अॅप डाउनलोड करून फक्त काही कागदपत्रांच्या आधारे शेतकरी स्वतःच आपला पीक विमा भरू शकतो. यामुळे वेळ आणि पैशांची मोठी बचत होईल.

28 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा जोर वाढणार: पंजाबराव डख यांचा अंदाज

मागील आठवड्यात पावसामुळे राज्यातील तापमान वाढले होते. मात्र, उत्तरेकडून वारे सक्रिय झाल्यामुळे राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, 22 नोव्हेंबरनंतर दिवसाही थंड वातावरण जाणवेल, तर 28 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा जोर वाढेल.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप गहू आणि हरभरा पेरणी केली नाही, त्यांनी आता हे पीक घेतल्यास पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मात्र बड्या नेत्यांवर हल्ले सुरूच

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली असली तरी काल राज्यात काही बड्या नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
याशिवाय नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कोल्हापूर, संभाजीनगर, आणि अमरावती भागातही हल्ल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. प्रचार संपल्यानंतरही हल्ले सुरू असल्याने निवडणूक वातावरण तापले आहे.

राज्यात किमान तापमानात मोठी घट, 11 अंशांवर पारा

राज्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
धुळे येथे सर्वांत कमी तापमान नोंदवले गेले, तर मुंबई आणि रत्नागिरीत कमाल तापमान 35.8 अंश सेल्सिअस राहिले. पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कळमना बाजारात लिंबाला 4 ते 5 हजार रुपयांचा दर

लिंबाची मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे कळमना बाजारात दर वाढले आहेत. सध्या 25-30 रुपये प्रतिकिलोने मिळणारे लिंबाचे दर 40-50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
दिल्ली परिसरात मागणी जास्त असल्याने लिंबाला 5 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

सोयाबीन शेतकऱ्यांचा रोष, हमीभावाचा प्रश्न अद्यापही कायम

राज्यातील विधानसभा निवडणूक सोयाबीन शेतकऱ्यांच्या समस्यांभोवती फिरताना दिसत आहे. सध्या सोयाबीनला 4000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, जो हमीभावापेक्षा कमी आहे.
राजकीय पक्षांनी 6000 ते 7000 रुपये हमीभावाची घोषणा केली आहे, मात्र शेतकरी अद्यापही सरकारकडून ठोस पावलं उचलण्याची अपेक्षा करत आहेत.

कृषी बाजार भाव, पिक विमा आणि योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर

पिक विमा, नुकसान भरपाई आणि शासकीय योजनांची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवरील व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा.

हे पण वाचा:
विमा सखी योजना विमा सखी योजना पात्रता अटी शर्ती सर्व माहिती जाणून घ्या कसे मिळवणार 7,000 रुपये

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा