पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानसभा निवडणूक सभा: चिमूर, सोलापूर आणि पुणे येथे आज सभा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन महत्वाच्या सभांचा कार्यक्रम आहे. चिमूर, सोलापूर आणि पुणे या तीन ठिकाणी भाजपच्या महायुतीच्या वतीने या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे सकाळी 11 वाजता सभा होईल. त्यानंतर, सोलापूर येथे दुपारी 3 वाजता सभा होईल, आणि पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता मोदींची सभा होणार आहे.

चिमूर येथे मोदींची पहिली सभा

चिमूरच्या पिंपळनेरी मार्गावरील 15 एकर जागेवर आयोजित करण्यात आलेली सभा विशेष महत्वाची आहे, कारण ही पूर्व विदर्भातील पहिली सभा असून, कदाचित एकमेव सभा असण्याची शक्यता आहे. या सभेसाठी प्रशस्त शामियाना आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहे. भाजपसाठी पूर्व विदर्भात जास्तीत जास्त जागा जिंकणे महत्वाचे आहे. सध्या, या भागातील 32 पैकी 21 जागा भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांकडे आहेत, तर उर्वरित 11 जागा महाविकास आघाडीकडे आहेत.

पूर्व विदर्भातील नक्षलवादाचा मुद्दा

पूर्व विदर्भ हा नक्षलवादाने प्रभावित भाग आहे, त्यामुळे या सभेत नरेंद्र मोदी नक्षलवाद आणि अर्बन नक्सल या मुद्द्यांवर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. याआधी महाराष्ट्रात झालेल्या एका सभेत त्यांनी “एक है तो सेफ है” असा नारा दिला होता, ज्यामुळे निवडणुकीच्या मूडला नवी दिशा मिळाली होती. त्यांनी अर्बन नक्सलवादावरून काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले होते, त्यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले होते. त्यामुळे, आजची सभा अनेक अर्थाने या निवडणुकीचा मूड सेट करणारी ठरू शकते.

हे पण वाचा:
चक्रीवादळ राज्यातील थंडीचा कडाका वाढतोय तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

अमित शहा यांच्या मुंबईतील सभा

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत आहेत. घाटकोपर पूर्वचे पराग शहा आणि कांदिवलीमध्ये आयोजित सभेमध्ये ते सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा