25%अग्रिम पिक विमा परभणी, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा वितरणास प्रारंभ
महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने परभणी, नांदेड, हिंगोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पीक विम्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार, पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा वितरण करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय पीक विमा समितीने दिले आहेत.
३० ऑक्टोबरपर्यंत वितरणाची अपेक्षा
अधिसूचना काढण्याची प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू झाली असून, १५ सप्टेंबरपर्यंत अधिसूचना जाहीर करण्यात आल्या होत्या. या सर्वेक्षणाच्या आधारे, ३० ऑक्टोबरपर्यंत पीक विम्याचे वितरण पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे. नुकतेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २५ टक्के अग्रिम पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे, तर हिंगोली, नांदेड आणि यवतमाळमध्येही लवकरच वितरणास सुरुवात होणार आहे.
व्यक्तिगत क्लेम प्रक्रियेला वेग: युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरु
शेतकऱ्यांनी केलेल्या व्यक्तिगत क्लेम प्रक्रियेची कामे जलदगतीने सुरू असून, कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांचे नुकसान निश्चित करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये जाऊन निरीक्षण करत आहेत. शेतकरी नोंदवलेल्या नुकसानाच्या आधारे तपशीलवार माहिती संकलित केली जात आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा सरासरी हिशोब काढला जाईल आणि त्यानुसार त्यांना पीक विमा मिळेल.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वेक्षणाची प्रक्रिया आणि क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर लवकरच मदत वितरण करण्यात येईल.