hawamaan andaaz राज्यात तापमान वाढ, रात्रीचा गारवा
राज्यात सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे, ज्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. काल, २७ ऑक्टोबर रोजी सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दिवसाचा तडाखा वाढत असताना, रात्रीच्या तापमानात मात्र थोडी घट पाहायला मिळत आहे.
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
ओडिशा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात चक्रकार वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून, ज्यामुळे राज्यात पूर्वेकडून वाऱ्यांचे प्रवाह वाढत आहेत. या वाऱ्यांसोबत थोडे बाष्प आल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भातील पूर्व भागांमध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाट भागांत विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांतही पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग आणि गोव्यात पावसाची नोंद
कालच्या नोंदीनुसार, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडल्याचे आढळले आहे. मात्र, राज्याच्या इतर भागांमध्ये मुख्यत्वे कोरडे हवामान राहणार आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.