राज्यात तापमानात घट; बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम या भागात पाऊस आला पोषक वातावरण hawamaan andaaz

hawamaan andaaz बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा प्रभाव

राज्यात सध्या तापमानात घट झाली असून हवामानतज्ञांच्या मते, याचे मुख्य कारण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ ओडिशाला धडकले. या चक्रीवादळाचे रूपांतर आता चक्राकार वाऱ्यात झाले असून, सध्या छत्तीसगड भागात  कार्यरत असून. या हवामान प्रणालीमुळे उत्तरेकडून येणारे कोरडे आणि थंड वारे अधिक सक्रिय झाले आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यातील पावसात घट दिसून येत आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान घट

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांतील तापमान सरासरीपेक्षा कमी झाल्याचे आढळले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली असून, त्याचा उरलेले अंश चक्राकार वाऱ्यात रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

पूर्व विदर्भात हलक्या सरींची शक्यता

आजच्या हवामान अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पावसाचा अंदाज नसल्याचे  हवामान तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा:
ईव्हीएम सुप्रीम कोर्टाचा ईव्हीएम विरोधातील याचिकेला नकार

पुढील काही दिवसांत किरकोळ पावसाची शक्यता

राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाडा, आणि त्याच्याशी लागून असलेल्या भागांमध्ये किरकोळ पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे या भागात पुढील काय दिवसात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील तापमानाची नोंद

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर ब्रह्मपुरी येथे ३५ अंश तापमान होते. महाबळेश्वरमध्ये मात्र थंडीचा अनुभव मिळाला असून, तेथे  निश्चयांकि तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 26 नोव्हेंबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा