हरभरा लागवड या गोष्टी लक्षात ठेवा पेरणी ते काढणी मार्गदर्शन.

हरभरा लागवड – तण नियंत्रणाचे महत्त्व

हरभरा पिकामध्ये तण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. पेरणीनंतर वीसव्या दिवशी पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसांनी दुसरी कोळपणी करणे सुचवले आहे. यामुळे तणांची स्पर्धा कमी होऊन पिकाची वाढ चांगली होते.

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी DAP आणि पोटाशची योग्य मात्रा

बागायती हरभरा लागवडीसाठी:

  • पेरणीच्या वेळी एकरी 75 किलो DAP, 25 किलो पोटाश, आणि दुय्यम अन्नद्रव्य मध्ये 1 बॅग सल्फर देण्याची शिफारस आहे.
  • जर 10-26-26 किंवा 12-23-16 खताचा वापर करायचा असेल यामधील दोन बॅग, तर त्यापैकी कोणतेही 1 खत निवडावे आणि 1 बॅग सल्फर सोबत दिल्यास योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल.

कोरडवाहू हरभरा लागवडीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

कोरडवाहू हरभरा लागवडीसाठी एक बॅग 20-20-00-13 किंवा DAP प्रति एकरी पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी एकरी 12 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यांना फवारणीच्या माध्यमातून खत देण्याची शिफारस आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

फवारणीसाठी वेळ आणि खतांची योग्य मात्रा

  • पहिली फवारणी: 12-61-00 दिवसांच्या दरम्यान 30  ते 35 दिवसांच्या दरम्यान 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावी.
  • दुसरी फवारणी: 00-52-34 हा ग्रेड 60 दिवसांच्या दरम्यान, घाट्यामध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत, 00-52-34 या खताचे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावे.

युरिया खताचा वापर टाळण्याचे आवाहन

सोयाबीनप्रमाणेच हरभरा पिकामध्येही युरिया खताचा वापर टाळावा, कारण युरियामुळे पिकाची अनावश्यक वाढ होते, ज्यामुळे फुलांची व घट्यांची संख्या कमी होते व उत्पन्नात घट येते.

वरील उपाययोजना शेतकऱ्यांना हरभरा पिकातून अधिक उत्पादन मिळविण्यात मदत करू शकतात.

सूचनातपशील
हरभरा लागवड – तण नियंत्रणाचे महत्त्वपेरणीनंतर 20 दिवसांनी पहिली कोळपणी आणि 30-35 दिवसांनी दुसरी कोळपणी करावी, यामुळे तणांची स्पर्धा कमी होते.
अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी DAP आणि पोटाशची योग्य मात्राबागायती लागवडीसाठी: पेरणीच्या वेळी 75 किलो DAP, 25 किलो पोटाश आणि 1 बॅग सल्फर प्रति एकरी द्यावे. जर 10-26-26 किंवा 12-23-16 खत वापरायचे असल्यास एक बॅग सल्फर सोबत दिल्यास योग्य.
कोरडवाहू हरभरा लागवडीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनकोरडवाहू लागवडीसाठी: एक बॅग 20-20-00-13 किंवा DAP प्रति एकरी पेरणीच्या वेळी द्यावे. 12 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी फवारणीद्वारे खत द्यावे.
फवारणीसाठी वेळ आणि खतांची योग्य मात्रा – पहिली फवारणीपहिली फवारणी: 30-35 दिवसांच्या दरम्यान, 12-61-00 खताचे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावे.
फवारणीसाठी वेळ आणि खतांची योग्य मात्रा – दुसरी फवारणीदुसरी फवारणी: 60 दिवसांच्या दरम्यान घाट्यात दाणा भरण्याच्या अवस्थेत, 00-52-34 खताचे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावे.

हरभरा पिकातील मररोग नियंत्रणासाठी पाणी व्यवस्थापनाची शिफारस

मररोग आणि मानकूज रोग टाळण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापनाची गरज

हरभरा पिकामध्ये मररोग आणि मानकूज रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होताना दिसतो, विशेषतः ज्या ठिकाणी पाटपाण्याने किंवा जास्त पाणी दिले जाते तिथे. अशा परिस्थितीत पाण्याची योग्य व्यवस्थापन पद्धती वापरणे गरजेचे ठरते. पाटपाणी देण्याऐवजी स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन पद्धती वापरल्यास पिकात मररोगाची समस्या कमी होऊ शकते.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनामुळे होणारे फायदे

स्प्रिंकलर पद्धतीने किंवा ठिबक सिंचनाने पाणी दिल्यामुळे पिकाचा ओलावा नियंत्रित राहतो. या पद्धतीने पाणी दिल्यास, पिकावरील आम धुतले गेल्यास दुसऱ्या दिवशी पुन्हा तयार होण्यास मदत होते. या पद्धतीमुळे उत्पन्नात घट येत नाही, उलट उत्पादन वाढण्यास मदत मिळते.

भारी जमिनीत फुलोर व दाणा भरण्याच्या अवस्थेत पाणी देण्याची शिफारस

भारी जमिनीत हरभरा पिकासाठी दोन पाण्यांची आवश्यकता असते. पहिले पाणी फुलोर अवस्थेच्या सुरुवातीला, म्हणजेच 30-35 दिवसांच्या दरम्यान स्प्रिंकलरच्या माध्यमातून द्यावे. दुसरे पाणी घाट्यामध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत 55-60 दिवसांच्या दरम्यान दिल्यास पिकाच्या वाढीला लाभ होतो.

शंभर टक्के उगवणीसाठी जमीन ओलावून पेरणी करण्याची सूचना

हरभरा पिकाच्या पेरणीवेळी जमीन योग्य ओलाव्यामध्ये असल्यास शंभर टक्के उगवण होते. यामुळे उत्पन्नात वाढ होऊन 12 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळवण्याचे लक्ष्य साध्य करण्यास मदत मिळते.  जर जमिनीमध्ये ओल नसेल तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी जमीन ओलावून घेतल्यास उत्पन्न वाढण्यास सहकार्य होईल.

हे पण वाचा:
विमा सखी योजना विमा सखी योजना पात्रता अटी शर्ती सर्व माहिती जाणून घ्या कसे मिळवणार 7,000 रुपये

मध्यम जमिनीत हरभरा लागवडीसाठी तीन पाण्यांची गरज

मध्यम जमिनीत हरभरा पिकासाठी 3 पाण्यांची गरज असते. पहिले पाणी 25 दिवसांनी, दुसरे 50 दिवसांनी, आणि तिसरे पाणी 65-70 दिवसांच्या दरम्यान देण्याची शिफारस केली आहे.

सूचनातपशील
मररोग आणि मानकूज रोग टाळण्यासाठी पाणी व्यवस्थापनमररोग व मानकूज टाळण्यासाठी स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचनाचा वापर आवश्यक. पाटपाणी देऊ नये.
स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनामुळे होणारे फायदेस्प्रिंकलर व ठिबक सिंचनामुळे ओलावा नियंत्रित राहतो, पिकावरील आम धुतले गेल्यास दुसऱ्या दिवशी पुन्हा तयार होते. उत्पन्नात घट होत नाही.
भारी जमिनीत पाणी व्यवस्थापनपहिले पाणी फुलोर अवस्थेच्या सुरुवातीला (30-35 दिवसांनी), दुसरे पाणी घाट्यात दाणा भरण्याच्या अवस्थेत (55-60 दिवसांनी) स्प्रिंकलरद्वारे द्यावे.
शंभर टक्के उगवणीसाठी ओलावलेली जमीनशंभर टक्के उगवणीसाठी जमिनीला ओलावा देऊन वापसा परिस्थितीत पेरणी करावी. यामुळे 12 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळवता येईल.
मध्यम जमिनीत पाणी व्यवस्थापनपहिले पाणी 25 दिवसांनी, दुसरे पाणी 50 दिवसांनी, तिसरे पाणी 65-70 दिवसांनी देणे आवश्यक.

हे पण वाचा:
लाडकी बहीण फडणवीस सरकारची कॅबिनेट ची पहिली बैठक लाडकी बहीण संदर्भात काय होणार निर्णय

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा