hawamaan andaaz चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर, राज्यात डिप्रेशनचा अंश येण्याची शक्यता
आज 25 ऑक्टोबर सायंकाळी 6:30 वाजेच्या हवामान अंदाजानुसार, ओडिशा किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकली असून, डिप्रेशनच्या स्वरूपात सक्रिय आहे. हे डिप्रेशन पश्चिमेकडे सरकत असल्याने राज्यात पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र राज्यात कुठेही पावसास अनुकूल असे ढग नाहीत, त्यामुळे आज-उद्या पाऊस होणार नाही, असा अंदाज आहे.
परवापासून विदर्भात पावसाची शक्यता
चक्रीवादळाच्या पश्चिमेकडे सरकण्यामुळे लवकरच विदर्भाच्या पूर्व भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हळूहळू मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अनुभव येऊ शकतो.
पुढील अद्यतनासाठी लक्ष ठेवा
राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत आणखी तपशीलवार अंदाज येत्या काही दिवसांत उपलब्ध होईल. त्याकरिता बाजूला दिलेल्या व्हाट्सअप वरती क्लिक करून आपल्या ग्रुप वरती सामील व्हा!