ड्रोन अनुदान योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ड्रोन अनुदान योजनेकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेत कृषी पदवीधारक आणि शेतकरी उत्पादक संस्थांना (FPO) विशेष सवलत मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आता महाडीबीटी फार्मर्स स्कीम च्या पोर्टलवर उपलब्ध आहे.
योजना कधी सुरू झाली?
ड्रोन अनुदान योजना 2020-2021 या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना ऑफलाइन पद्धतीने राबवली जात होती. मात्र, आता अर्ज प्रक्रियेला अधिक सोपे आणि सुलभ बनवण्यासाठी महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
अर्ज प्रक्रिया
अर्जदारांनी महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलवर लॉगिन करून अर्ज भरायचा आहे. लॉगिनसाठी आधार ओटीपी किंवा बायोमेट्रिकची सुविधा उपलब्ध आहे. लॉगिन केल्यानंतर ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करावे आणि नंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ड्रोनसाठी अर्ज करावा. या योजनेत वैयक्तिक कृषी पदवीधारक, सीएससी केंद्रे आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPO) साठी वेगवेगळे पर्याय निवडले जाऊ शकतात.
अर्ज सादर करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
- ड्रोनसाठी योग्य पर्याय निवडावा.
- अर्ज सादर करताना शर्तींना मान्यता द्यावी.
- अर्ज करताना प्राथमिकता क्रम द्यावा.
- अर्ज सादर करताना काही बाबींना लॉटरी पद्धतीने लाभ मिळण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरत असताना पहिले अर्ज असेल तर ₹23.60 इतके शुल्क भरावे लागेल, मात्र आधी अर्ज केले असेल तर शुल्क आकारले जाणार नाही.
पुढील प्रक्रिया
अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल. निवड झाल्यानंतर अर्जदारांना पुढील कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यासंबंधी वेळोवेळी माहिती महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होईल.
ड्रोन अनुदान योजनेचे उद्दीष्ट अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणे हे आहे.