पंजाबराव डख म्हणतात शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी पोषक हवामान: पाऊस ओसरला, थंडी येण्याची शक्यता

प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात पाऊस जवळपास ओसरला असून, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील. शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत हरभरा पेरणी किंवा कांद्याचे रोप टाकण्याची तयारी करावी, असे डख यांनी सुचवले आहे.

24 ते 29 ऑक्टोबर दरम्यान कोरडे हवामान

राज्यात 24 ऑक्टोबरपासून पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धुके आणि थंडी जाणवेल, विशेषतः 25 ऑक्टोबरला अधिक धुके होण्याची शक्यता आहे. डख यांच्या म्हणण्यानुसार, विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये 28 आणि 29 ऑक्टोबरला थोडे ढगाळ वातावरण राहू शकते, तर तुरळक ठिकाणी  हलका पाऊस होईल मात्र पावसाचा जोर राहणार नाही.

दिवाळीच्या आसपास पावसाची शक्यता

पंजाबराव डख यांनी सांगितले की, दिवाळीच्या आसपास म्हणजे 31 ऑक्टोबर ते 2-3 नोव्हेंबर दरम्यान राज्यात एकदा पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी योग्य तयारी करावी.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 25 नोव्हेंबर 2024

नोव्हेंबरमध्ये थंडीची लाट

डख यांनी पुढे सांगितले की, 5 नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य बीज प्रक्रिया आणि खतांचे नियोजन करून, पेरणीसाठी ही वेळ अत्यंत पोषक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी अनुकूल वातावरण मिळत असल्याने, त्यांनी वेळ न दवडता आपल्या शेतीची तयारी करून घ्यावी, असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.

हे पण वाचा:
गुजरात आजचे कापूस बाजार भाव Gujarat Cotton rate 25 नोव्हेंबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा