pm Kisan fraud app सोलर पंप योजना आणि पीएम कुसुमची फसवणूक
नवनवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी सुकर होत असली तरी, त्याच टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. यापूर्वी सोलर पंप देण्यासाठी पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांकडून डुप्लिकेट अर्ज भरून घेण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करण्यात आली. या प्रकरणात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.
ई पीक पाहणी आणि पीएम किसान फसवणूक
तसेच, ई पीक पाहणीच्या नावाने बनावट एप्लिकेशन आणून शेतकऱ्यांची लूट केली गेली. आता पीएम किसान योजनेंतर्गतही शेतकऱ्यांना फसवणूक केली जात आहे. एक व्हाट्सअप फाइल, ज्याचे नाव “पीएम किसान ॲप” आहे, पाठवून शेतकऱ्यांचा मोबाइल हॅक केला जातो. हे एप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर मोबाइलमधील संपर्क आणि इतर महत्त्वाची माहिती हॅक करून चोरी केली जाते.
बँक खात्यांवर सायबर हल्ले
हे एप्लिकेशन फॉरवर्ड केल्यावर इतर शेतकऱ्यांच्या मोबाइलवरही हॅकिंगचा धोका वाढतो. या हॅकिंगच्या माध्यमातून बँक खात्यांतील माहिती चोरली जाते आणि लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांना वारंवार सतर्क केले जात आहे की, अशा प्रकारच्या फाईल्स डाउनलोड न करता त्या लगेच डिलीट कराव्यात.
सावधगिरी आणि उपाय
जर कोणी अशा प्रकारची फाइल चुकून डाउनलोड केली असेल, तर मोबाइल त्वरित फॉरमॅट करावा आणि बँकेच्या किंवा इतर महत्त्वाच्या खात्यांच्या डिटेल्स डिलीट कराव्यात. यामुळे संभाव्य लुटीपासून बचाव होऊ शकतो. सायबर क्राईमच्या तक्रारी दाखल करूनही, फसवणूक झाल्यानंतर त्या रकमेला परत मिळवणे खूप अवघड आहे.
अधिकृत एप्लिकेशनचा वापर करा
शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी कोणत्याही अनधिकृत फाइल्स डाउनलोड न करता, फक्त गुगल प्ले स्टोरवरील विश्वसनीय आणि अधिकृत एप्लिकेशन्सचाच वापर करावा. तसेच, व्हॉट्सअॅपवर आलेल्या अनोळखी फाइल्स कधीही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.