hawamaan andaaz चक्रीवादळाची स्थिती
आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता हवामानाचा आढावा घेतला असता, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागात चक्रीवादळाची स्थिती तयार झालेली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडून दक्षिणेकडे राज्याकडे सरकणाऱ्या वाऱ्यांना खेचत आहे, ज्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत. पावसाची शक्यता कमी आहे.
पुढील २४ तासांचे हवामान अंदाज
चक्रीवादळ २५ तारखेच्या पहाटे उत्तर-पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे, आणि ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ धडकण्याचा अंदाज आहे. त्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असू शकतो. चक्रीवादळाच्या अंशाच्या पुढील मार्गावर राज्यातील पावसाची शक्यता अवलंबून आहे. सध्या, दिवाळीच्या आसपास पावसाची शक्यता काही मॉडेल्स दर्शवत आहेत, परंतु याबाबत अजून निश्चितता नाही.
23 Oct बंगालच्या उपसागरात #चक्रीवादळ_दाना: पारादीप (ओडिशा)पासून 560किमी,सागर बेटाच्या (पश्चिम बंगाल) 630किमी,उ/प जाणार व२४ पहाटे उ/प बंगालच्या उपसागरात #तीव्र_चक्रीवादळाची दाट शक्यता.२४रात्री ते २५ऑक्टो सकाळपर्यंत पुरी व सागर बेटांदरम्यान उ ओडिशा-प बंगाल किनारपट्टी ओलांडेल as SCS https://t.co/17E89NE0kR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 23, 2024
राज्यातील ढगाळ वातावरण आणि कोरडे हवामान
सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि पालघरच्या काही भागांमध्ये हलकं ढगाळ वातावरण आहे. मात्र, राज्यातील इतर बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडे झाले आहे, आणि ढग फारसे पाहायला मिळत नाहीत.
संभाव्य पावसाची शक्यता असलेले जिल्हे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूरच्या पश्चिम भाग, सांगली व साताऱ्याच्या पश्चिम भागांमध्ये गडगडाटासह अल्प प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
तर, रायगड, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली, तर गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. मात्र, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही.