16 नोव्हेंबर 2024: येत्या 24 तासांत राज्यातील हवामान अंदाज

राज्यातील हवेची दिशा आणि ढगाळ वातावरण हवामान अंदाज

आज सकाळी 9:30 वाजता राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरातून बाष्प पोहोचत असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सकाळच्या सॅटेलाईट इमेजवरून दिसते की, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, आणि रत्नागिरी या भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. इतर भागांमध्ये मात्र विशेष ढगाळपणा दिसून येत नाही.

पावसाचा अंदाज

येत्या 24 तासांत राज्यातील पावसाचा विचार केला असता, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि सांगली जिल्ह्यांच्या पश्चिम भागात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या भागांतील काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

राज्याच्या इतर भागांत विशेष पावसाचा अंदाज नाही.

तालुकानिहाय पावसाची शक्यता असलेले भाग

महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदनगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दौडामार्ग, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, आणि राजापूर या तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर भागातील स्थिती

पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आणि अहिल्यानगर या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

शेतकऱ्यांसाठी सूचना

ढगाळ हवामानामुळे शेती पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो फुलोरा अवस्थेत असणाऱ्या पिकांना योग्य त्या बुरशीनाशकाची कीटकनाशकाची फवारणी करा. दोन ते तीन दिवसात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा