राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने विविध पक्षांनी प्रचार मोहीम सुरू केली आहे. महायुती सरकारनेही प्रचाराचा शुभारंभ करून शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. कालच कोल्हापुरात महायुतीची जंगी-सभा पार पडली, ज्यात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
काम भारी; आता पुढची तयारी!
महायुतीने या निवडणुकीसाठी “काम भारी, आता पुढची तयारी” हे ब्रीदवाक्य ठेवले आहे. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी संयुक्तपणे जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यात शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे.
शेतकरी सन्मान निधी योजना – १२ हजारांवरून १५ हजार
भाजप सरकारने राबविलेल्या शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रुपये दिले जातात. या निधीत वाढ करून आता १५,००० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा
कोल्हापूरमध्ये आज पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत
मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:#Shivsena #EknathShinde pic.twitter.com/cCXGCb7Mb5— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) November 5, 2024
महायुतीच्या जाहीरनाम्यातील आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी. राज्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जमाफीची मागणी करत आहेत, ज्याची दखल घेत महायुतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वांसाठी १० महत्त्वाच्या घोषणा
महायुतीने शेतकऱ्यांसह राज्यातील नागरिकांसाठी १० महत्त्वाच्या घोषणांची सूची जाहीर केली आहे.