राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या

आज 8 नोव्हेंबर 2024, शुक्रवार. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या, ज्यामध्ये बाजार भाव, निवडणूक, आणि शासकीय योजना यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींचा समावेश आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राची मदत

आज राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विधानसभा प्रचारात सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आजपासून राज्यात दौरा करणार आहेत. या दौऱ्यात 10 सभांचे आयोजन करण्यात आले असून पुढील सहा दिवसांत या सभांचा सपाटा सुरू राहील. 14 नोव्हेंबरला मुंबईत विशेष सभा आयोजित केली जाईल.

राज्यातील थंडी आणि पावसाचा अंदाज

राज्यातील थंडीत वाढ होत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. 14 ते 16 तारखेच्या दरम्यान काही मॉडेल्स राज्यात पावसाच्या अनुकूलतेचा अंदाज दर्शवतात. दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण, आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही, कारण पावसाचा प्रभाव मर्यादित क्षेत्रांपुरता राहणार आहे.

हे पण वाचा:
चक्रीवादळ राज्यातील थंडीचा कडाका वाढतोय तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

मालेगाव बाजार समितीतील मक्याची आवक

7 नोव्हेंबर रोजी मालेगाव बाजार समितीमध्ये मक्याची सर्वाधिक आवक 42,603 क्विंटलची झाली. यासाठी सरासरी 2,137 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हायब्रीड, लाल, पिवळी, लोकल, आणि सफेदगंगा प्रकारांची बाजारात आवक झाली.

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले की, 14 नोव्हेंबरपर्यंत राज्यात कोरडे हवामान राहील. त्यानंतर, 14 नोव्हेंबरपासून पुढे कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर भागांमध्ये हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही.

पंतप्रधानांचा उत्तर महाराष्ट्र दौरा

धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा आयोजन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत नाराजी आहे. पंतप्रधान यावर काय बोलतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

हे पण वाचा:
ईव्हीएम सुप्रीम कोर्टाचा ईव्हीएम विरोधातील याचिकेला नकार

निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस

काँग्रेसने कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचे वचन दिले आहे. तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, महिलांना मोफत बस प्रवास आणि दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने शेतमालाला हमीभाव, जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव, आणि ‘विकेल ते पिकेल’ धोरण लागू करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

कर्नाटकचा साखर हंगाम सुरू

कर्नाटकने उत्तर भागातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नियोजित वेळेपेक्षा आठ दिवस आधीच, म्हणजे 8 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 15 नोव्हेंबरऐवजी लवकर घेण्यात आला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा

बांगलादेशने कांदा आयातीवरील शुल्क हटवले आहे, ज्यामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीस चालना मिळणार आहे. आयात शुल्क हटवल्यामुळे कांद्याचे दर सुधारण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 26 नोव्हेंबर 2024

कृषी जगतातील ताज्या घडामोडी, बाजारभाव, पिक विमा, शासकीय योजना आणि इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी, बाजूला  दिलेल्या व्हाट्सअपवर क्लिक करून आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा!

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा