मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही यंदाच्या निवडणुकीतील गेम चेंजर ठरली आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ही योजना सादर केली होती आणि तातडीने लागू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना निवडणुकीपर्यंत ७,५०० रुपये जमा
निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते म्हणजेच एकूण ७,५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनाम्यात वचन दिले होते की, सत्तेत परतल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढवून दर महिन्याला २,१०० रुपये केली जाईल.
महायुतीला स्पष्ट बहुमत
निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवत महायुतीने सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आता पात्र महिलांना पुढील हप्ता कधी मिळणार आणि त्यात १,५०० रुपये मिळतील की २,१०० रुपये, याची उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अमलबजावणीची शक्यता एप्रिलपासून
अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर २१ एप्रिलपासून योजनेची पुढील अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. प्रचारादरम्यान महाविकास आघाडीने महिलांना दरमहा ३,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ज्या महायुती सरकारने योजना आणली व १ जुलै २०२४ पासून दरमहा १,५०० रुपये देण्यास सुरुवात केली, त्यांच्यावरच महिलांनी विश्वास दाखवला आहे.
महिलांचा विश्वास आणि सरकारचे वचन
महायुती सरकारने वचन दिले होते की, पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम दरमहा २,१०० रुपये केली जाईल. निकालावरून स्पष्ट होते की, महिलांनी या वचनावर विश्वास ठेवून महायुतीला पाठिंबा दिला आहे. राज्यातील २८८ आमदारांपैकी तब्बल १८७ आमदारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.
पुढील निर्णयाची प्रतीक्षा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच मिळेल. आता १,५०० रुपये की २,१०० रुपये दरमहा दिले जातील, याचा निर्णय लवकरच होईल.