फळ पीक विमा वितरणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. यापूर्वी आपण पाहिले होते की, आंबिया बहार 2023 फळपिक विमा हा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. 817 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण करण्यासाठी कंपन्यांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच, या वितरणासाठी आवश्यक असलेले राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे हप्ते देखील शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले होते.
जळगाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रारंभ
जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना यापूर्वीच पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आली होती. याचबरोबर, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काजू आणि आंबा या फळपिकांसाठी विमा वितरणाची सुरुवात केली.
इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी खुशखबर
इतर जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना देखील वितरणाची प्रतीक्षा होती. बरेच दिवस फळपिक विमा मंजूर असूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरण झालेले नव्हते. अखेर मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा, केळी या मंजूर फळपिक विम्याचे वितरण सुरू झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामध्ये सर्कलनिहाय मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आणि वैयक्तिक क्लेम असलेल्या शेतकऱ्यांनाही विमा वितरण सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही फळपिक विमा वितरण होत आहे.
पिक विमा वाटपासंबंधित पुढील अपडेट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद.