प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पाऊस लवकरच संपेल, पण त्याआधी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाऊस लवकरच संपणार, शेतकऱ्यांनी तयारी करावी
राज्यातील पाऊस आता लवकरच परतणार आहे. १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस भाग बदलत पडेल. यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, जालना, बीड, धाराशिव, नगर, संभाजीनगर या भागांमध्ये जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस शेवटचा असेल आणि नंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील पाऊस कमी होईल.
मान्सूनचा परतावा आणि धुक्याचे वातावरण
२४ ऑक्टोबर रोजी मान्सून राज्यातून पूर्णपणे परत जाणार आहे. त्यानंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन धुई, धुके पसरणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आलाय उत्तर महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत धुके येण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
पेरणीचे नियोजन करा
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, पाऊस आता लवकरच संपेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पेरणीचे नियोजन करायला काही हरकत नाही. वेलवर्गीय पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक त्या तयारीसाठी दक्ष रहावे
अचानक हवामान बदलाचे संकेत
डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत अचानक हवामान बदल होऊ शकतो. पाऊस अर्धा ते एक तास जोरात पडेल आणि नंतर लगेच थांबेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या तयारीसाठी योग्य पावले उचलावी.
नोव्हेंबरमध्ये कडक थंडीचा अंदाज
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, ५ नोव्हेंबरपासून राज्यात कडक थंडीचा अनुभव येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीच्या आधी आपली शेतीची तयारी पूर्ण करावी.
राज्यातील हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपले नियोजन करून शेतातील पिकांची काळजी घ्यावी.