१. नोव्हेंबरमध्ये थंडी कमी, तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार
हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२. रेशन कार्ड धारकांसाठी केवायसीची मुदतवाढ
रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी प्रक्रिया करण्यासाठी मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आणखी वेळ मिळणार आहे.
३. कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली
यंदा तब्बल २२ लाख गाठी कापसाची आयात होणार असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांचे मत आहे.
४. कपाशीला हमीभावाची मागणी
कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने बाजारात कमी आवक आहे. शेतकरी हमीभावाची मागणी करत आहेत.
५. आंतरराष्ट्रीय बाजारात कपाशी दरात चढ-उतार
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कपाशीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. भारतीय कापसाला ५५,५०० रुपये प्रति खंडी दर मिळत असला तरी, देशांतर्गत बाजारात दर ६,७०० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे.
६. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज
प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण राहील आणि ५ नोव्हेंबरपासून थंडीची सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
७. कापसाच्या आयात आणि सीसीआय लिलावाचा परिणाम
देशात २२ लाख गाठी कापसाची आयात आणि ११ लाख गाठींचा सीसीआयकडून लिलाव होणार आहे. यामुळे यंदा कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त.
८. सीसीआयकडून ५०० खरेदी केंद्रांची उभारणी
सीसीआयने राज्यभरात ५०० खरेदी केंद्र उभारण्याचे नियोजन केले असून त्यात १२० केंद्रे महाराष्ट्रात, ५९ मराठवाड्यात आणि ६१ विदर्भात असतील. अपेक्षित दर्जाचा कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयने निर्देश जारी केले आहेत.
९. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा विश्वास जनतेला दिला आहे.
१०. व्यावसायिक गॅस दरात वाढ, घरगुती गॅस दरात स्थिरता
सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.