राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या १५ महत्त्वाच्या बातम्या ३-११-१०२४

महाराष्ट्रात पावसाचे संकट दूर, कोरड्या हवामानाची शक्यता

महाराष्ट्रावर आलेल्या पावसाच्या संकटातून दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वार्यांनी राज्यात प्रवेश केला आहे, त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीत मिळत नाही योग्य भाव

दिवाळीच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकावे लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

सोयाबीन बाजारभावात घसरण, हमीभावापेक्षा ५००-७०० रुपये कमी दर

सोयाबीन सध्या ४००० ते ४२०० रुपये दरात बाजारात विकले जात आहे, जे हमीभावापेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

नोव्हेंबरमध्ये कमी थंडीची शक्यता

हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यासाठी अंदाज जारी केला आहे. या महिन्यात थंडीची तीव्रता कमी राहील आणि सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.

खरीप पिकांचे नुकसान, ७६ लाखाहून अधिक दावे विमा कंपनीकडे

खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आतापर्यंत ७६ लाख ३६ हजार दावे विमा कंपनीकडे दाखल झाले आहेत, अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.

कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना मिळत नाही योग्य बाजारभाव, हरभऱ्याला सोन्याचा भाव

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना हरभरा मात्र चांगला भाव  मिळतोय. तज्ञांच्या मते, यंदा हरभऱ्याचा भाव चांगला राहील.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, नोव्हेंबरच्या शेवटी हप्त्याचे वितरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की लाडक्या बहिणींसाठी पुढील हप्त्याचे वितरण नोव्हेंबरच्या शेवटी होणार आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण, मजूर मिळेना

कापूस वेचणीसाठी मजूर मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कापूस वेचणीसाठी अडचणी येत असल्याचे मजुरांकडून सांगण्यात येत आहे.

आचारसंहितेमुळे निधी अडकला, शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब

विधानसभेच्या आचारसंहितेमुळे शासकीय निधी अडकला असून, यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.

हे पण वाचा:
विमा सखी योजना विमा सखी योजना पात्रता अटी शर्ती सर्व माहिती जाणून घ्या कसे मिळवणार 7,000 रुपये

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा