हवामान विभागाचा अंदाज पुढील काही दिवस कसे राहणार वातावरण!

राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता कायम असून, अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार झाले असून, लवकरच त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे.

संभाव्य चक्रीवादळाची शक्यता

सध्याच्या हवामान स्थितीचा विचार करता, कमी दाबाचे क्षेत्र पुढे तीव्र होऊन depression बनू शकते. जर वातावरण अधिक अनुकूल राहिले, तर कदाचित चक्रीवादळाची शक्यताही निर्माण होऊ शकते. परंतु, याबाबत अद्याप निश्चित माहिती नसून, पुढील अपडेट्स लवकरच दिले जातील.

राज्यात पावसाची स्थिती

राज्यात पावसाची शक्यता कायम आहे, मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाची तीव्रता कमी राहील. काही भागांत जोरदार पाऊस होईल, तर काही भागांत फक्त हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

राज्यात पुढील 24 तासांत काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात पुढील 24 तासांत काही भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळच्या उपग्रह प्रतिमेनुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर या भागांत ढगाळ वातावरण आहे. इतर भागांत विशेष मोठे ढगाळ वातावरण दिसत नसले, तरी काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.

पावसाची शक्यता असलेले मुख्य भाग

ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता अधिक आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही काही भागांत गडगडाटी पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची शक्यता

बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस सार्वत्रिक नसेल; काही भागांत पाऊस होईल, तर काही भागांत फक्त ढगाळ वातावरण असेल.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

इतर भागांतील पावसाची शक्यता

पुणे, सातारा, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, अहमदनगर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली या जिल्ह्यांत स्थानिक वातावरण तयार झाल्यास गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. अन्यथा, विशेष मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा