राज्यातील शेतकऱ्यांसाठी 15 ठळक बातम्या: कापूस सोयाबीन अनुदान, हवामान, पीक विमा, आणि इतर महत्त्वाचे मुद्दे

24 लाख शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित

सोयाबीन कापस अनुदान गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन दरात झालेल्या घसरणीनंतर राज्य शासनाने हेक्टरी ₹5,000 चे अनुदान जाहीर केले होते. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली असली, तरी 96 लाखांपैकी 24 लाख शेतकऱ्यांनी अद्याप सहमतीपत्र सादर केलेले नाही. यामुळे अनुदान प्रक्रियेत अडथळे येत असून, निवडणुकीनंतरच या योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज: डख यांच्या अंदाजानुसार दक्षिण महाराष्ट्रात पाऊस

प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले की, पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, आणि गोवा या भागांत 17 नोव्हेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे. इतर भागांत हवामान मुख्यतः कोरडे राहील.

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा

रब्बी हंगाम 2024-25 साठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना केवळ ₹1 मध्ये पीक विमा भरता येईल.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू
  • अंतिम तारीख:
    • ज्वारी आणि हरभरा (30 नोव्हेंबर 2024)
    • गहू बागायती (15 डिसेंबर 2024)
    • उन्हाळी भात व भुईमूग (31 मार्च 2025)

सूचना 24/7 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्याची सोय नसल्याने आमची टीम तुमच्या सेवेत 24 तास सेवेत आहे. अगदी मोफतच तुमचा पिक विमा भरून मिळेल 9822950959 या क्रमांकावर संपर्क करून मोफत सहाय्य घेता येईल. 24 तासाच्या आत विमा पावती तुमच्या मोबाईलवर पाठवली जाईल.

पंतप्रधान मोदी यांची घोषणा: सोयाबीनला ₹6,000 हमीभाव

सोयाबीन दरातील घसरणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला ₹6,000 हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

नाफेडकडून सोयाबीन खरेदीसाठी अटी शिथील

सोयाबीन खरेदीसाठी नाफेडने ओलाव्याचा निकष 12% वरून 15% करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली असून, यामुळे शेतकऱ्यांना जाचक अटींमुळे होणारे नुकसान कमी होईल.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

तापमानात चढ-उतार: काही ठिकाणी थंडी, तर काही ठिकाणी उष्णता

  • उत्तरेकडील भाग: धुळे येथे 11°C तापमानाची नोंद झाली असून, विदर्भ व मराठवाड्यातही तापमान 15°C च्या खाली आहे.
  • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र: सांताक्रूझ येथे 36.8°C उच्चांकी तापमान नोंदवले गेले.

हवामान विभागाचा येलो अलर्ट

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

मिशन स्वराज: महाराष्ट्राच्या राजकारणावर ध्रुव राटीचा व्हिडिओ

प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राटी यांनी “मिशन स्वराज” नावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आधारित या व्हिडिओला 24 तासांत 7 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव, आणि शासकीय योजनांची माहिती

शेतकऱ्यांना कृषी बाजारभाव, पीक विमा, आणि नुकसान भरपाईसंदर्भातील अपडेट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि हवामानविषयक ताज्या बातम्या मिळवा. बाजूला दिलेल्या व्हाट्सअप वरती क्लिक करा.

हे पण वाचा:
विमा सखी योजना विमा सखी योजना पात्रता अटी शर्ती सर्व माहिती जाणून घ्या कसे मिळवणार 7,000 रुपये

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा