राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 15 ठळक बातम्या

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

आज 6 नोव्हेंबर 2024, पांडव पंचमी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणून त्यांना मदतीचा हात देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

साखर उद्योगाकडून गाळप हंगाम लांबवण्यास विरोध

साखर उद्योगाने विधानसभा निवडणुकांमुळे गाळप हंगाम पुढे ढकलू नये, अशी मागणी केली आहे. उद्योगाच्या मते, गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्यास इथेनॉल उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या मागणीसाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) शासनाला पत्रव्यवहार केला आहे.

राज्यात तापमानात चढ-उतार

राज्यात किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. सांताक्रुज येथे 35.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. डहाणू, रत्नागिरी, अमरावती आणि अकोला या शहरांमध्येही पारा 35 अंशांवर पोहोचला आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

केज तालुक्यात राजमा पिकाची वाढ

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शेतकरी हरभरा पिकाऐवजी राजमा लागवडीला प्राधान्य देत आहेत. हरभरा पिकात मर रोगाचा त्रास असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून राजमा पिकाकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात सोयाबीनची विक्रमी आवक

मागील 48 तासांत राज्यात सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. लातूर बाजार समितीत 15 हजार क्विंटल सोयाबीनची विक्रमी आवक झाली असूनही दर स्थिर आहेत. सणांच्या काळातही शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लासलगावमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा

लासलगावमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली असून दर 5 हजार रुपयांवर पोहोचला आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास विलंब होतोय, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांसाठी जाहीरनामा

महायुती सरकारने काल आपल्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून, शेतकरी सन्मान निधी योजनेत 12 हजार रुपयांऐवजी आता 15 हजार रुपये दिले जातील. याशिवाय, एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गावांचा विकास करण्याची योजना

राज्यातील गावांचा विकास होण्यासाठी महायुती सरकारने 45 हजार गावांमध्ये रस्ते बांधण्याची योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

हे पण वाचा:
विमा सखी योजना विमा सखी योजना पात्रता अटी शर्ती सर्व माहिती जाणून घ्या कसे मिळवणार 7,000 रुपये

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा