राज्यातील थंडीचा कडाका वाढला, तापमानात मोठी घट बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

गोंदिया, सोलापूर आणि मध्य महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

चक्रीवादळ अपडेट: राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, गोंदिया, सोलापूर, नाशिक, महाबळेश्वर, सातारा, पुणे, आणि अहिल्यानगर या भागांमध्ये तापमान 14°C पर्यंत खाली आले आहे. विदर्भातील काही भागांतही तापमान 14°C पेक्षा कमी नोंदवले गेले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी तापमान 14°C च्या आसपास राहिले आहे.

कोकण किनारपट्टीवरही थंडीची चाहूल

कोकण किनारपट्टीवरील ठाणे, पालघर, आणि मुंबई या भागांमध्येही थंडी जाणवत आहे. मुंबईसाठी तापमान 18 ते 20°C दरम्यान राहील, तर ठाणे आणि पालघर भागांत तापमान 14 ते 16°C पर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तापमान 16 ते 17°C दरम्यान राहील.

उत्तर भागांमधील थंड वाऱ्यांचा प्रभाव

राज्यात थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असून, त्यामुळे थंडी अधिक टिकून राहण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, बारामती, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, गोंदिया, आणि भंडाऱ्याच्या भागांमध्ये तापमान 12°C पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

बंगालच्या उपसागरातील सिस्टीमचे निरीक्षण

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, 23 नोव्हेंबरच्या आसपास हे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. या सिस्टीममुळे डिप्रेशन तयार होऊ शकते, आणि अनुकूल परिस्थिती असल्यास चक्रीवादळाची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या ही सिस्टीम अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे, मात्र त्याचा ठोस अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही.

राज्यात ढगाळ हवामान नाही, पाऊस नाही

सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यात कुठेही ढगाळ हवामान नाही. पावसाची शक्यता आज रात्री आणि 22 नोव्हेंबरला (उद्याही) अजिबात नाही. हवामान पूर्णतः कोरडे राहील. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा