मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: अर्ज प्रक्रिया सुरू, शेतकऱ्यांसाठी विविध सवलती

सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्जदारांनी त्यांच्या प्रवर्गानुसार अनुदान लाभ घेण्यासाठी अर्ज करावा. या योजनेत एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या 5% रक्कम भरावी लागते, तर इतर जात प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10% रक्कम भरावी लागते.

सौर कृषी पंपांच्या किमती आणि लाभार्थी हिस्सा

  1. 3 एचपी सौर कृषी पंप
    • मूळ किंमत (जीएसटी सह): ₹1,93,803
    • ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹19,380
    • एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹9,690
  2. 5 एचपी सौर कृषी पंप
    • मूळ किंमत (जीएसटी सह): ₹2,69,746
    • ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹26,975
    • एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹13,488
  3. 7.5 एचपी सौर कृषी पंप
    • मूळ किंमत (जीएसटी सह): ₹3,74,402
    • ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹37,440
    • एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹18,720

अर्जदारांसाठी सूचना

शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रवर्गानुसार अर्ज सादर करून, योजनेतील अनुदानाचा लाभ घ्यावा. अर्ज स्वीकृत झाल्यानंतर लाभार्थींसाठी पंपाच्या किमतीनुसार योग्य तो हिस्सा भरावा लागेल.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा