Soybean kapus anudan सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरणाला सुरुवात: ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३९८ कोटी रुपये जमा

Soybean kapus anudan खरीप हंगाम २०२३ साठी शेतकऱ्यांना विशेष अनुदान वितरण

राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०२३ च्या खरीप हंगामासाठी विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार Eknath Shinde, Ajit Pawar and Devendra fadnavis  यांच्या हस्ते या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या योजनेत पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा anudan Vitran करण्यात आले आहेत.

९६ लाख शेतकरी पात्र, उर्वरित शेतकऱ्यांना लाभ लवकरच

या योजनेसाठी राज्यातील एकूण ९६ लाख शेतकरी खातेदार पात्र ठरले आहेत. आधार संलग्न माहिती आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात हेक्टरी ५,००० रुपये अनुदान Shetkari anudan

शेतकऱ्यांना हेक्टरी ५,००० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. दोन हेक्टरपर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून, पहिल्या टप्प्यात ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल.

केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ

जे शेतकरी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) anudan bank account पद्धतीने रक्कम जमा होईल. शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

वितरणात अडचणी दूर, अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे अनुदान वितरण कार्यक्रम लांबणीवर गेला होता. परंतु आता त्या सर्व अडचणी दूर करून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही शंकेशिवाय आपल्या खात्यातील अनुदानाची पडताळणी करावी.

उर्वरित शेतकऱ्यांना लाभासाठी प्रतीक्षा करण्याचे आवाहन

ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी. केवायसी प्रक्रिया पूर्ण होताच, त्यांच्या खात्यातही अनुदान जमा करण्यात येईल.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा