solar pump Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अनुदानावर सोलार पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. राज्य शासनाने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना आखली आहे.
अर्जदारांसाठी सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट प्रक्रिया
योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आपला सेल्फ सर्व्हे पूर्ण करणे आणि पेमेंट करणे आवश्यक आहे. महावितरणने अर्जदारांना या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ऑप्शन दिले आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत सेल्फ सर्व्हे व पेमेंट करणे बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज बाजूला ठेवले जाऊन नवीन शेतकऱ्यांना संधी देण्यात येईल.
24 ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक
अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी 24 ऑक्टोबरपर्यंत सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे पात्र होऊनही या योजनेचा लाभ घेण्याची संधी गमावू शकता. त्याऐवजी नवीन अर्जदारांना या योजनेमध्ये संधी दिली जाईल.
सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट न करण्याची समस्या
काही शेतकऱ्यांनी अद्यापही सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रिया आणि योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुने अर्जदार आणि डुप्लिकेट नोंदणीची समस्या
योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी मेडा किंवा महावितरणकडे अर्ज केले आहेत, परंतु त्यांची नोंदणी पूर्ण झालेली नाही किंवा ते डुप्लिकेट नोंदणी करत आहेत. यामुळे काही अर्ज नाकारले जात आहेत. अर्जदारांनी आपले लॉगिन आणि पासवर्ड शोधून अर्ज पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
यासाठी बाजूला दिलेल्या व्हाट्सअप वरती क्लिक करून ग्रुप वरती सामील व्हा