PM Kisan 18th Installment 2024: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी

PM Kisan 18th Installment 2024: शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका विशेष कार्यक्रमादरम्यान हा हप्ता जाहीर केला जाईल. या योजनेअंतर्गत 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

केवायसी पूर्ण करणे आवश्यक

कृषी विभागाने लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तत्काळ करून घ्यावी. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही किंवा लँड शेडिंगचे इशू आहेत, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून हे समस्येचे निराकरण करावे, जेणेकरून हप्ता वेळेत खात्यात जमा होईल.

योजनेचे 17 हप्ते याआधीच वितरित

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. यातील 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील कार्यक्रमातून जाहीर केला होता. दर चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता या योजनेअंतर्गत दिला जातो, यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते.

हा 18 वा हप्ता आता 5 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान जारी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, ही योजना संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना हातभार देणारी ठरली आहे.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा