राज्यातील हवामानाचा अंदाज: थंडी अजूनही कमी, काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम hawamaan andaaz

hawamaan andaaz राज्यात थंडीचा प्रभाव अजून म्हणावा तसा जाणवत नसून तापमानात किरकोळ घट झाली असली, तरी सरासरीपेक्षा अधिक तापमान दिसून येत आहे. राज्याच्या उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याने ढगाळ वातावरणात हळूहळू कमी होत चालले आहे.

दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण गोव्यात ढगाळ हवामान

दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, परवापासून हे ढग जवळपास नाहीसे होतील आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे तापमानात घट होऊ शकते.

तापमानाचा अंदाज

उद्या, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात तापमान २२ अंश सेल्सिअस ते २४-२६ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. विदर्भ, मराठवाडा आणि इतर राज्याच्या भागात तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

थंडीचे आगमन लवकरच

राज्यात थंडीचे आगमन लवकरच होईल असा अंदाज  तज्ञांकडून व्यक्त  केला जात असून, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा