राज्यात ढगाळ हवामान, तापमानात घट कमी – विशेष थंडी येण्यासाठी गुरुवारपर्यंत प्रतीक्षा hawamaan andaaz

hawamaan andaaz राज्यातील विविध भागातील तापमानाचा अंदाज

आज सकाळी नाशिक, नंदुरबार, धुळे, पुणे, सातारा, आणि अहिल्यानगरसह काही भागांमध्ये तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. गोंदियातही तापमान १६-१७ अंश सेल्सिअस राहिले, तर कोकणात किनारपट्टीच्या ठिकाणी तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. तसेच, कोल्हापूर, सांगली, सातारा दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव आणि मराठवाड्याच्या इतर भागांत तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस होते.

सरासरीपेक्षा जास्त तापमान; नेहमीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअस अधिक

राज्यात सरासरीपेक्षा तापमान दीड ते तीन अंश सेल्सिअस अधिक आहे. त्यामुळे राज्यातील हवामान अजूनही विशेष थंड झालेले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात विशेष घट दिसत नाही.

ढगाळ हवामान कायम; उद्या पावसाचा अंदाज नाही

उत्तरेकडून कोरडे वारे आणि पूर्वेकडील काही प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, वाशिम, यवतमाळ, परभणी, आणि हिंगोलीच्या आसपास ढगाळ वातावरण आहे. यामुळे तापमानात विशेष घट झाली नाही.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

गुरुवारपासून थंडी वाढण्याची शक्यता

उद्या राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. मात्र, विशेष थंडी यायला अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. गुरुवारपासून राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता असून, थंडीचा प्रभाव वाढेल.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा