राज्यात हवामान कोरडेच राहणार; आठवडाभर पावसाची शक्यता नाही hawamaan andaaz

hawamaan andaaz गेल्या आठवड्यात दक्षिण महाराष्ट्रात काही भागात पाऊस

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नगरपर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पुणे, रायगड आणि काही इतर ठिकाणी हलका पाऊस झाला, मात्र राज्यातील बाकी भागात हवामान मुख्यत्वे कोरडे राहिले.

सध्या पूर्वेकडून येणाऱ्या वार्यांमुळे ढगाळ वातावरण, थंडीची कमी शक्यता

सध्या राज्यात पूर्वेकडून वारे येत असल्यामुळे काही भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याच वार्यांमुळे राज्यात ठरलेली थंडी अद्याप अनुभवता आलेली नाही. सॅटलाईट इमेजनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळपासून नागपूरच्या काही भागांपर्यंत ढगाळ वातावरण आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील हलके ढग पाहायला मिळत आहेत.

आठवडाभर पावसाची शक्यता नाही; तापमानात हळूहळू घट

आगामी आठवड्यात राज्यात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. मात्र, हळूहळू तापमानात घट होणार आहे. गुरुवारच्या आसपास उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये तापमानात थोडीशी घट जाणवेल, जे अंदाजे १४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. मात्र, या आठवड्यात विशेष थंडीचा अनुभव येणार नाही.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

कोकण किनारपट्टीवर दिवसाचे तापमान थोडे अधिक

पूर्वेकडून वाहणाऱ्या वार्यांमुळे कोकण किनारपट्टीवरील दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा थोडे अधिक राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा