बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळाचा तडाका: ओडिसा आणि पश्चिम बंगालला मोठा फटका
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र चक्रीवादळाने ओडिसातील पुरी आणि सागर बेटाजवळ जमिनीवर आले आहे. या तडाक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्यांना मोठा फटका बसला आहे.
कापसाचे मोठे नुकसान, कंपन्यांकडून दुर्लक्ष
चक्रीवादळामुळे आणि सततच्या पावसामुळे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे कापूस उत्पादक कंपन्यांकडून दुर्लक्ष होत आहे, शेतकऱ्यांच्या तक्रारी. हातात आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात आहेत.
राज्यात रविवारपासून पुन्हा पावसाचा इशारा
राज्यात दाना चक्रीवादळाचा अंश राहिल्याने रविवारपासून पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरांत बदल; देशांतर्गत बाजारात काहीसा चढ-उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 71.75 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत, तर देशांतर्गत वायदे काहीसे वाढले आहेत. सध्या कापसाचे दर 6700 ते 7600 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत, परंतु यामध्ये अद्यापही चढ-उतार सुरूच आहे.
सोयाबीन हमीभाव केंद्रांची संख्या वाढली, मात्र अटींचे पालन अनिवार्य
राज्यात शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हमीभाव खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. 478 खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली असून त्यापैकी 371 केंद्रे सुरू आहेत. तथापि, सोयाबीनमध्ये 12 टक्के ओलाव्याची अट असल्याने आतापर्यंत फक्त 4,070 क्विंटल खरेदी झाली आहे.
खरीप रब्बी पिक विमा मंजूर, निधीसाठी प्रतीक्षा
शासनाने खरीप आणि रब्बी पिक विमा योजना मंजूर केली आहे, परंतु निधी अभावी शेतकऱ्यांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. यामुळे पिक विमा योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडत आहे.
31 ऑक्टोबरपूर्वी रेशन कार्डधारकांची केवायसी अनिवार्य
राज्यातील रेशन कार्डधारकांनी आपली केवायसी 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांना रेशन मिळणार नाही. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत, त्यामुळे सर्व कार्डधारकांनी तत्काळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.