आज, 22 नोव्हेंबर 2024, शुक्रवार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. बाजार भाव, निवडणूक, शासकीय योजना, आणि हवामान अंदाज यासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या येथे सादर केल्या आहेत.
उद्योगपती गौतम अदानींना न्यूयॉर्क कोर्टाचा दणका
न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने गौतम अदानी आणि इतर सात जणांना फसवणूक आणि लाच प्रकरणात दोषी ठरवले आहे. सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 25 कोटी अमेरिकन डॉलरची लाच दिल्याचा आरोप कोर्टाने केला आहे. यावरून संजय राऊत यांनीही अदानींवर टीका केली आहे. महाराष्ट्र राज्य अडाणीला विकायला काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बंगालच्या उपसागरात लवकरच समुद्र खवळणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, 23 नोव्हेंबरच्या आसपास हे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. या प्रणालीमुळे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या प्रणालीचा स्पष्ट अंदाज अद्याप हवामान विभागाने दिलेला नाही.
अन्न मंत्रालयाने 5.8 कोटी रेशन कार्ड रद्द
केंद्र सरकारच्या डिजिटायझेशन मोहिमेमुळे 5.8 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत. या प्रक्रियेमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक झाली आहे. रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली असून, वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास कार्ड रद्द होऊ शकते.
राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे की 29 नोव्हेंबरपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील. मात्र, 1 ते 3 डिसेंबर दरम्यान राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याच्या शक्यतेमुळे या पावसाचा प्रभाव जाणवेल.
उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक दिसून येत आहे. ग्रामीण व शहरी भागात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारठा वाढला
उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील गारठा वाढला आहे. निफाड आणि धुळे येथे किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्यामुळे तापमान घट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
कृषी बाजार भाव, पिक विमा, आणि शासकीय योजना
शेतकऱ्यांसाठी बाजार भाव, पिक विमा, नुकसान भरपाई आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप लिंकवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा.