हरभरा लागवड अशी करा भरघोस उत्पन्नाची हमी!

हरभरा लागवड करण्यासाठी शेतकरी पारंपारिक पद्धतीला बाजूला ठेवून बेड पद्धतीचा अवलंब  करण्याकडे आता कल वाढतोय. या पद्धतीत टोकन पद्धतीने हरभऱ्याची लागवड केली जाते, ज्यामुळे हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश अधिक मिळतो. यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि घाट्यांची संख्या अधिक मिळते.

पारंपारिक पद्धतीतील अडचणी

पारंपारिक पद्धतीत पाणी साचण्याची समस्या आणि हवा खेळती न राहिल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच, पिकांची वाढ नीट होत नसल्यामुळे उत्पादन कमी येते.

बेड पद्धतीचे फायदे

बेड पद्धतीत चार फूट अंतरावर सऱ्या पाडल्या जातात आणि  एका सऱ्यांमध्ये दोन ओळीं टोकन पद्धतीने लागवड केली जाते. यामुळे झाडांमधील अंतर चार ते सहा इंच राहते, ज्यामुळे हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश अधिक मिळतो. या पद्धतीमुळे 15 ते 18 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळू शकते.

हे पण वाचा:
hawamaan andaaz महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; उत्तर महाराष्ट्रात गारठा, दक्षिण भागात कमी थंडीचा अंदाज hawamaan andaaz

यशस्वी शेतकऱ्यांची उदाहरणे

ज्या शेतकऱ्यांनी बेड पद्धतीचा अवलंब केला आहे, ते अधिक उत्पादन घेत आहेत. फुले कृपा किंवा PKV – 4 सारख्या वाणांची लागवड करून शेतकऱ्यांनी यशोगाथा निर्माण केल्या आहेत. या पद्धतीने आंतरमशागत सोपी होते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

पेरणीमध्ये सुधारणा

काही शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करताना पाच फण्याच्या यंत्रामध्ये मधला फणा बंद करतात, ज्यामुळे चार ओळी नंतर एक ओळ रिकामी राहते. या रिकामी ओळीमुळे हवा खेळती राहते आणि आंतरमशागत अधिक चांगली होते.

शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनासाठी बेड पद्धतीचा अवलंब करावा, असे तज्ञांचे आवाहन आहे.  तसेच हरभरा पिकातील फवारणी नियोजन तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप वरती क्लिक करून आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद!

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 13 नोव्हेंबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा