लाडकी बहीण योजना निधीचे वितरण सुरू: 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान बँक खात्यांमध्ये जमा होणार पैसे

लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थिनींसाठी मोठी खुशखबर आहे. ज्या लाभार्थ्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये अर्ज केले होते आणि त्यांना अद्याप निधी मिळाला नव्हता, त्यांच्या बँक खात्यांमध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा निधी 25 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे.

निधी मिळाल्यास प्रतिक्रिया द्या

ज्या बहिणींना 25 सप्टेंबरपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे, त्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करावी. जर तुम्हाला पैसे मिळाले असतील, तर कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. ज्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता, त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील, आणि ज्यांना मागील हप्त्यात तीन हजार रुपये मिळाले होते, त्यांना आता दीड हजार रुपये मिळतील.

आधार लिंक आणि खाते सक्रिय असणे आवश्यक

पैसे मिळण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम एक दिवसात करू शकता.  म्हणजेच पोस्ट बँकेचे खाते काढू शकता त्यानंतर, तुम्ही पोस्टामधून सुद्धा पैसे घेऊ शकता.

तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का नाही हे बॅलन्स इन्क्वायरी नंबर, बँकेच्या ऍप किंवा गूगल पे, फोन पे सारख्या सेवांद्वारे तपासू शकता. जर 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला निधी मिळाला नसेल, तरीही तुमचं बँक खाते आणि आधार लिंक सक्रिय असणं गरजेचं आहे.

लाभार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की हा महत्त्वपूर्ण अपडेट इतर लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवावा.

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा