राज्यात थंडीची लाट: आज आणि उद्याचा हवामान अंदाज

हवामान अंदाज-थंडीचा जोर वाढला, नागपूर आणि विदर्भात कडाक्याची थंडी

राज्यात आज सकाळपासूनच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. नागपूर, गोंदिया, अहिल्यानगर, सोलापूरचे जेऊर, नाशिक, जळगाव या भागांमध्ये चांगली थंडी जाणवली. पुणे, सातारा, सोलापूरच्या उत्तर भागांसह संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानात घट पाहायला मिळाली. कोकणातील उत्तरेकडील किनाऱ्यापासून दूर असलेल्या भागांतही थोड्याफार प्रमाणात थंडीची अनुभूती झाली. मात्र, मुंबई आणि आजूबाजूच्या भागांत अद्याप चांगल्या थंडीची प्रतीक्षा आहे.

सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद

राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे ही थंडी वाढल्याचे जाणवते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वाऱ्यांच्या प्रवाहात बदल झाल्यास राज्यातील दक्षिण भागात थंडी 2-4 दिवसांनी कमी होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरडे हवामान; पावसाचा कोणताही अंदाज नाही

सध्या राज्यात हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. उद्याही राज्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली नाही.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन बदल: १ डिसेंबर २०२४ पासून लागू होणारे नवीन नियम?

मतदानाच्या दिवशी थंडीचा अनुभव

उद्याच्या मतदानाच्या दिवशी राज्यातील अनेक भागांत चांगली थंडी जाणवेल. गोंदिया, नागपूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, बारामती, पुण्याच्या आसपास सकाळी तापमान सुमारे 12°C पर्यंत राहील. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पुणे, सातारा, सोलापूर, विदर्भ या भागांत तापमान 14 ते 15°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मुंबई व कोकणात सौम्य थंडी

मुंबईच्या आसपास तापमान 19 ते 20°C दरम्यान राहील. मात्र, किनाऱ्यापासून दूर असलेल्या भागांत तापमान घटून 14 ते 16°C पर्यंत येण्याची शक्यता आहे. कोल्हापूरसारख्या ठिकाणी तापमान 16 ते 18°C च्या दरम्यान राहील.

हे पण वाचा:
देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 2 डिसेंबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा